रत्नागिरीनजीक रनपार खाडीत होडी उलटली ; १६ जणांना वाचवले

रत्नागिरी : तालुक्यातील पावस तीर्थक्षेत्री परशुराम जयंती उत्सवानिमित्त रनपार गावात आलेले काही जण तेथील खाडीत नौका विहार करत असताना त्यांची होडी अचानक बुडाली. यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून याच भागात असलेली फिनोलेक्स कंपनीची बोट तसेच सागरी कवच अभियानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बुडणाऱ्या होडीमधील १६ जणांना वाचवले. मंगळवारीदुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दुसऱ्या होडीतून वाचवण्यात आलेले दुर्घटनाग्रस्त होळीतील पर्यटक.

होडीतून फिरण्यासाठी हे सर्वजण गेले होते. अचानक फिनोलेक्स जेटीसमोर त्यांची होडी बुडाली. यावेळी फिनोलेक्स कंपनीची बोट आणि पूर्णगड सागरी पोलीस ठाणे सागरी कवच अभियानाचे अंमलदारांसह बीएसएफ जवान यांच्या मदतीने होडीवरील बुडणार्‍या 16 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, या घटनेत होडीला खाडीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली आहे.
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सागरी कवच अभियान सुरू आहे. या माध्यमातून समुद्रकिनार्‍यावरती मोठ्या प्रमाणात गस्त सुरू आहे. ही गस्त सुरू असताना दुपारी 3 च्या सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती नावाची होडी घेऊन काहीजण फिरण्यासाठी रनपार खाडी परिसरात निघाले होते.

यादरम्यान सागरी कवच अभियान सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आले की, फिनोलेक्स जेटीच्या समोर होडी बुडत आहे. त्यांनी तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या दोन बोटीच्या सहाय्याने घटनास्थळी जाऊन बुडणार्‍या 16 जणांना वाचवले. होडी मात्र पाण्यात बुडाली. त्या नंतर त्या 16 जणांना किनार्‍यावर सुरक्षितपणे आणण्यात आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE