- पर्यावरणपूरक सीएनजी वाहने घेतलेल्यांचा संतप्त सवाल
- रत्नागिरीत सीएनजी पंपांपुढे वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा!
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजी वाहनांमध्ये भरून घेण्यासाठी पर्यावरणपूरक इंधनावर चालतात म्हणून अशी वाहने घेतलेल्याना आपला अर्धा ते अख्खा दिवस सीएनजीच्या पंपापुढे घालवावा लागत आहे. तेव्हा कुठे वाहनामध्ये सीएनजी भरला जात असल्याने अशी वाहने घेतलेले ग्राहक आता कंटाळले आहेत. सीएनजीच्या तुटवड्यामुळे ‘सीएनजी नको, पण राग आवर’ असे म्हणण्याची वेळ रांगांमध्ये ताटकळलेल्या वाहनधारकांवर आली असून सीएनजी वाहनांची अनेकांची हौस फिटली आहे.
साधारणपणे पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीचे पंप सुरू झाले. डिझेल पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन म्हणून लोक सीएनजीवर चालणारी वाहने घेऊ लागले. यात व्यक्तिगत वापराच्या वाहनांशिवाय रिक्षा, टॅक्सी देखील सीएनजीवर चालू लागल्यामुळे अशा वाहनांचा वापर वाढू लागला आहे. मात्र सध्या रिक्षा तसेच टॅक्सीसारख्या वाहनांना सीएनजी भरून घेण्यासाठी भल्या मोठ्या रंगांमध्ये उभे राहावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती सांगायची तर रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील इतरही सीएनजी पंपांपुढे मोठमोठ्या रांगा बघायला मिळत आहेत.
रिक्षावाले पुरते मेटाकुटीला
रत्नागिरीचे उदाहरण सांगायचे तर सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांमध्ये गॅस भरून घेण्यासाठी अनेक तास रांगांमध्ये उभे राहवे लागत आहे. यामुळे रिक्षावाल्यांना व्यवसायिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. रिक्षामध्ये गॅस भरून मिळणार कधी आणि भाडी मारण्याकरता थांब्यावर उभे राहायचे कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
