ना. नितेश राणेंनी घेतली पारकर कुटुंबियांची भेट

  • पारकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पारकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी ना. नितेश राणे यांच्यासोबत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE