उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील करळ/ सोनारी ब्रिजवर गॅस टँकर अवघड वळणावर दि. १९ मे रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास उलटला. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी, लाखो रुपयाची गॅस गळती झाली असुन गॅसचे धूर गावांमध्ये २ ते ३ किलोमीटरवर पसरले. रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला.
घटनास्थळी उरण पोलीस स्टेशन, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस अधिकारी पोचले असुन पुढील तपास करीत आहेत. बिपीसीएल रेस्क्यू टीम ,सिडको अग्निशमन, जेएनपीटी अग्निशमन, ट्रॅफिक विभागाचे डीसीपी तिरुपती काकडे, ट्रॅफिक विभागाचे एसीपी विठ्ठल कुबडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे, न्हावाशेवा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मुजावर,गव्हाण फाटा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक बदगुजर आदी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघात ठिकाणी पाहणी केली.
वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
