रत्नागिरी :- 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.
यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
