आंतरराष्ट्रीय योग दिनी २१ जूनला रत्नागिरी येथे कार्यक्रम


रत्नागिरी  : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर येथील बॅडमिंटन हॉल येथे १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे, असे प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कळविले आहे.


शारीरिक आणि अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व विचारात घेऊन दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून या दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे., यानुसार 21 जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे.
जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी., नेहरू युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनीही सुध्दा आपआपल्या ठिकाणी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार साजरा करावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.


योग दिन प्रोटोकॉल व इतर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी योग शिक्षक प्रशिक्षण केंद्र प्रमुख राजेंद्र आयरे, मो. 9404774879 यांच्याशी संपर्क साधावा.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE