- शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून
उरण (विठ्ठल ममताबादे) : शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून मुकरीची वाडी आणि लालवाडी करंजाडे मध्ये सामाजिक बांधिलकी जपत भव्य शालेपयोगी किटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
या मध्ये प्रामुख्याने मुलांना बॅग वह्या पेन पेन्सिल कंपास पेटी अश्या वस्तूंचे वाटत करण्यात आले. वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास महिला मंडळ पदाधिकारी सुषमा मयेकर, ज्योती टोटरे ,प्रियांका ठाकूर, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील, उपाध्यक्ष प्रशांत निर्मळ, संदीप पाटील, मनीष कटेकर, राकेश कुसले, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, प्रशांत शेट्टी, सुरेश बार्वे,अमर कुसळे,अमर सावंत,अक्षय मोरे,सिद्धार्थ अंबावडे, समीर कांबळे,राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आल्याने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
