कोकण रेल्वे मार्गावर 1 मेपासून उधना-मंगळुरु विशेष गाडी धावणार


रत्नागिरी ः पश्चिम रेल्वेच्या सुरतनजीकच्या उधना जंक्शनहून थेट कोकण कोकण रेल्वे मार्गावर येणार्‍या साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेेर्‍या दि. 1 मे ते 13 जून 2022 या कालावधीत चालवल्या जाणार आहेत.
या संदर्भात रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार उधना जंक्शनहून ही गाडी (09057/09058) दि.1 मेपासून दर रविवारी रात्री 8 वाजता सुटेल आणि सोमवारी ती मंगळूरु स्थानकावर सायंकाळी 6 वा. 15 मिनिटांनी पोहेचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दि. 2 मे 2022 पासून दर सोमवारी सायंकाळी 7 वा. 45 मिनिटांनी मंगळुरुहून सुटेल आणि मंगळवारी सायंकाळी 7 वाजता ती गुजरातमधील सुरतजवळील उधना जंक्शनला पोहचेल. दि. 1 मे 13 जून 2022 या कालावधीत या विशेष गाडीच्या एकूण सात फेर्‍या होणार आहेत.
एकूण 22 डब्यांच्या गाडी साप्ताहिक विशेष गाडीला वलसाड, वापी, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी, करमाळी, मडगाव, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होनावर, मुर्डेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड, कुंदापूर, बारकूर, उडूपी, मुलकी, सुरतकल, ठोकूर हे थांबे देण्यात आले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE