एस. एस. पाटील शाळेने राबविला लीड स्कूल उपक्रम

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मध्ये कार्यरत असलेल्या एस. एस. पाटील इंटरनॅशनल शाळेने चालू शैक्षणिक वर्षात (2022-23) नविन व अनोख्या पर्वाला सुरूवात केली आहे. प्रशालेने लिड (LEAD) स्कूल ही संकल्पना या वर्षी राबवली आहे. शैक्षणीक क्षेत्राने डिजिटल जगाकडे टाकलेले हे एक पुढचे पाऊल आहे.शिक्षक व विद्यार्थी यांच्या अडचणींना अचूकपणे जाणून त्यावर उत्तम जागून त्यावर उत्तम उपाय या LEAD स्कूलने शोधला आहे.

शिक्षकांच्या हातातील पुस्तके, पेपरचे गट्ठे यांची जागा आता फक्त एका टॅब (Tab) ने घेतली आहे. मुलांची बौद्धिक गरज जाणून घेता प्रत्येक वर्गात TV बसवण्यात आले. त्याचबरोबर LEAD स्कूल ने त्यांचे तयार पाठ्यक्रमही शाळेला पुरवले आहेत. शिक्षकांचा रोजचा दिवस त्यातले तासिका यांचे उत्तम आयोजन टॅब मध्ये असते. सध्याच्या व पुढे येणाऱ्या स्पर्धेचे जग लक्षात घेता इंग्रजी भाषेला असणारे महत्त्व समजून व त्याची आपल्या येणाऱ्या पिढीला असलेली गरज ओळखून इंग्रजी भाषा शिकण्यासाठी LEAD स्कूल या अंत्यत सुलभ परंतु प्रभावी प्रयोग या संकल्पनेत समाविष्ठ आहे.

LEAD स्कूल ने दिलेला पाठ्यक्रम, दिनक्रम आखून दिलेला शाळा कितपत व कशा प्रकारे अवलंबून करते याचीही देखरेख केली जाते. व त्यासाठी दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी LEAD स्कूलचे संस्थापक तसेच सी. ई.ओ (CEO) सुमीत मेहता आणि स्मिता डिओरा,को – सीईओ व सह संस्थापक यांनी शाळेला भेट दिली.

सकाळच्या प्रार्थने पासुनच LEAD चे सदस्य उपस्थित होते. खुप संपूर्ण शाळा, प्रत्येक वर्गाचे निरीक्षण करण्यात आले. निरिक्षणानंतर LEAD चे प्रमुख व इतर सदस्य S.S P. शाळेच्या कामकाजावर अंत्यत खुश होते.त्यांच्या निर्देशनास आलेली प्रत्येक बाब पाहुन त्यांच्या चेह-यावर स्मित हास्य उमलत होते. LEAD च्या सदस्यांनी यापूर्वीही अश्या अनेक भेटी शाळेला दिल्या होत्या. त्या प्रत्येक भेटीतील निरिक्षणात SSP शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला थोडी व शिक्षकवृंद यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. व या पुढे ही करत राहतील. तसेच S.S.P शाळेचा आलेख गगनभेदी आहे असे मत व्यक्त करत शाळेवर दृढ विश्वास दाखवला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE