रत्नागिरी : त्रिरत्न बौध्द महासंघाच्या वतीने रत्नागिरी येथे शनिवार दि. 22 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात सदर शिबीर होणार आहे. यावेळी या शिबिराला धम्मचारी शिलरश्मी ( उल्हासनगर ), धम्मचारी सत्यरत्न, धम्मचारी चंद्रनाथ धम्मचारी सत्यसागर आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
धम्मदायाद सुत्त याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान केलेल्या धम्मचक्र सतत गती देण्याचे काम रत्नागिरी त्रिरत्न बौध्द महासंघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरात होणार आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी त्रिरत्न बौध्द महासंघ रत्नागिरी जिल्हाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हातील बौध्द बंधू-भगिनींनी उपस्थित राहवे, असे आवाहन रत्नागिरी त्रिरत्न बौध्द महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.















