उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे ग्रामपंचायत सरपंच अलका सतिष म्हात्रे आणी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोप्रोली गावातील ड़म्पींग ग्राउंड समस्ये बाबत आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन कचरा निर्मुलन बाबत यशस्वी कायम स्वरुपी तोडगा काढला. हीं बाब आरोग्याच्या दृष्टीने खुप गंभीर झाली होती. ही बाब लक्षात घेऊन सरपंच आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी यातून मार्ग निघावा यासाठी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन कचरा प्रश्ना बाबत सिडको मुख्य अधिकारी यांची चर्चा करुन सिडको च्या ड़म्पींग ग्राउंड वर नेण्याची पर्यायी जागा उपलब्ध करुन कोप्रोली गावातील कचरा प्रश्न कायम स्वरुपी सोडवून स्वच्छ कोप्रोली सुंदर कोप्रोली घोषणा केली.कोप्रोली ग्रामपंचायत आणी ग्रामस्थांतर्फे आमदार महेश बालदी यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले गेले.
यावेळी कोप्रोली सरपंच अलका सतिष म्हात्रे,उरणं तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर,पुर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील ,उपसरपंच रुपालि देवेंद्र म्हात्रे,माजी उपसरपंच विपुल म्हात्रे, माजी उपसरपंच शुभांगी योगेश म्हात्रे,माजी उपसरपंच निरज पाटील, पाणी कमिटी सभापति दत्तराज म्हात्रे, कोप्रोली भाजपा गाव अध्यक्ष सचिन गावंड़, उरण तालुका वाहतूक अध्यक्ष भाजपा सुदेश पाटील,उद्योजक देवेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड़,सारडे ग्रामपंचायत सदस्य भार्गव म्हात्रे,कुणाल पाटील ,गीरीष पाटील,युवा सचिव कल्पेश म्हात्रे, धनेश गावंड़ ,बाळा गावंड़, सुशांत पाटील आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.















