शंभर रुपयातील शिधासंच आला पण E POS मशीनमध्ये अडकला!

सर्व्हरमधील तांत्रिक समस्येमुळे अनेकांवर हात हलवत परत जाण्याची वेळ

फराळ बनवून झाला तरी आनंदाचा शिधा रेशनवरच!


रत्नागिरी : राज्य सरकारने दिवाळीसाठी शिधापत्रिकेवरील लाभधारकांसाठी जाहीर केलेला शंभर रुपयातील शिधासंच रेशन दुकानांवर दाखल झाला असला तरी सर्व्हरच्या समस्येमुळे अनेकांना एक तर हात हलवत परत जावे लागत आहे किंवा तासंतास ताटकळत राहावे लागत आहे.


सरकारमान्य रस्ता दर धान्य दुकानांवर धान्य देताना महिन्याच्या २० तारखेनंतर सर्वर मध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्यामुळे अनेक लाभार्थींना धान्यासाठी ताटकळत राहावे लागते तर काहींना धान्य न घेताच ई पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा दुकानांवर येऊन धान्य घ्यावे लागत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील अनेक रेशन दुकानांवरही या समस्येचा सामना करावा लागत आहे. याचा त्रास शिधापत्रिकाधारकांबरोबरच रेशन दुकान चालकांनाही सहन करावा लागत आहे. कधी नेटवर्कची समस्या तर कधी सर्वर मधील तांत्रिक अडचण अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने यावेळी दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा ‘ या अंतर्गत केवळ शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, रवा, साखर तसेच पामतेल या प्रति किलो चार वस्तूंचा संच दिवाळी सणाच्या तोंडावर जाहीर केला. या निर्णयाचे राज्यातील सर्वसामान्य जनतेकडून स्वागत करण्यात आले

घोषणेनुसार राज्यातील रेशन दुकानांवर हा शिधासंच वाटप करण्यासाठी दाखल देखील झाला. मात्र, सर्वरमधील तांत्रिक अडचणीमुळे दिवाळीचा फराळ बनवून झाला तरी अनेकांना हा शिधा lसंच वेळेत मिळण्यात अडचणी उद्भवत आहेत. मशीनमधील तांत्रिक समस्येमुळे अनेकांना घरी परतावे लागत असल्यामुळे रेशन दुकान चालकांना लाभार्थींच्याव लाखोल्यांना सामोरे जावे लागत असल्याची कैफियत रेशन दुकान चालकांनी मांडली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE