भाजपाच्या संघटनात्मक दौऱ्याला दाभोळे गटातून प्रारंभ

संगमेश्वर : ना. रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांनी जिल्हाव्यापी दौऱ्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जि.प. गटातून केली आहे.

चोरवणे गावात पहिली बूथस्तरीय बैठक संपन्न झाली. बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुढील सर्व बैठका पार पडल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत काही ठिकाणी बूथप्रमुख तसेच शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. संघटनात्मक बांधणीसोबतच विविध विकासकामांची साधकबाधक चर्चा करण्यात आली. पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून काही प्रस्तावित कामे प्रलंबित होती याबाबत तत्काळ अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून चर्चा करून विचारणा केली व कामे मार्गी लावण्याबाबत सूचित केले.

यांचबरोबर भारतीय जनता पार्टी मजबूत होण्यासाठी आम्ही योगदान देण्यास सर्वतोपरी तयार आहोत, असे आश्वासन लोकांनी दिल्याने दौरा फलदायी ठरला. यावेळी तालुका संघटन सरचिटणीस अमित केतकर तसेच तालुका ओबीसी आघाडी अध्यक्ष शंकर लाड, विजय गांधी उपस्थित होते. त्यापुढे ओझरे जि. प. गटात भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी उपाध्यक्ष रूपेश कदम यांच्या हॉटेल गिरिराज येथे मोर्डे पं. स. गणातील सर्व बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी आवश्यक असे संघटनात्मक बदल करण्यात आले. नव्या चेहऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली. सर्वात महत्वाचे असे अनेक वर्षे प्रलंबित असणारे श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणार्‍या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन राजेश सावंत यांनी दिले. तसेच जि.प. च्या एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरजवळ फोनद्वारे चर्चा करून दिवाळीनंतर या रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राजेश सावंत यांच्यासोबत अमित केतकर उपस्थित होते. यापुढे पूर्ण संगमेश्वर तालुका तसेच दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अशाच प्रकारे दौरे करून भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम करण्याचे संकेत राजेश सावंत यांनी दिले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE