रत्नागिरी : महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींचे मंदिर रविवारी दिवाळीनिमित्त सजलेले पाहायला मिळाले.
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा सदैव ओघ सुरू असतो. संकष्टी चतुर्थी असो भाद्रपदी गणेशोत्सव असं की दसरा… त्या त्या वेळेचं औचित्य साधून मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते.
रविवारी देखील मंदिरात दिवाळीचे औचित्य साधून आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली आहे. देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर व सहकाऱ्यांनी ही सजावट करण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे रविवारी श्रींचे मंदिर सजलेले पाहायला मिळाले. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील ही सजावट भावली.
















