डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईत स्थानिक सुट्टीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्याचे निर्देश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.