रत्नागिरी : खेलो इंडिया,तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाँडिचेरी तायक्वॉंदो स्पोर्टस् असोसिएशन आयोजित पाहिली खेलो इंडिया महिला लीग फेज (3)2023-24,दिनांक 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम, इंदिरा गांधीं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाँडिचेरी आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर महिला तायक्वॉंदो संघाच्या प्रशिक्षकपदी तिवंदामाळ,मंदरुळ,गावाच्या सुकन्या तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तेजस्विनी आचरेकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या त्या तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा येथील सचिव व लांजा तालुका तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक आणि एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल लांजा येथे तायक्वॉंदो प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय पंच,राष्ट्रीय खेळाडू, कुकीऑन दक्षिण कोरिया ब्लॅक बेल्ट 1 दान, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिध्दा महिला स्वसंरक्षण प्रशिक्षक व लांजा तालुक्यातील विविध स्तरावर खेळाडूंना तायक्वॉंदो या खेळाचे तसेच महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहेत.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल कुणबी सेवा संघ लांजा संचालित कुलकर्णी काळे छात्रालय लांजा,तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा,रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ,तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया चे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग खेळाडू आणि सर्व लांजा व राजापुर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या