Ultimate magazine theme for WordPress.

आधार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

0 20

उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) :  भारताचा ७५ रावा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशभर विविध उपक्रम, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधनपर पथनाट्य द्वारे  मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

     भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “आधार सामाजिक सेवाभावी संस्था” व सिटिझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने आधार संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी ताई धोत्रे व  सिटिझन हायस्कूल च्या प्रिन्सिपॉल सरवत पेणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी  उरणमधील सिटिझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून स्वातंत्र्य दिन  साजरा केला. शाळेच्या प्रिन्सिपल सरवत पेणकर व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी धोत्रे, , अर्चना तळेकर, ऋषाली पवार, स्वाती धोत्रे, सायली वेळासकर, रेखा लहासे, क्रांती पाटील, रश्मी पाटील, रोशनी साळवी, नयना धोत्रे,तृप्ती भोईर आदी महिला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.