https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

नवघर येथील तु. ह. वाजेकर कमानीपर्यंत बस सेवा सुरु करण्याची मागणी

0 52

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण आगारमधुन उरण ते नवघर सर्कल ते भेंडखळ मार्गावर एस. टी. च्या फे-या होत आहेत.त्यामुळे नवघर, कुंडेगाव आणि पागोटे या गावातील ग्रामस्थांना तसेच या तिन्ही गावा मधील नागरिक व विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. या तिन्ही गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी फुंडे हायस्कुल, जेएनपीटी येथे जात आहेत. काही ग्रामस्थ नोकरीच्या कामा निमित्त रोज येत जात असल्याने विदयार्थी व ग्रामस्थ, महिला वर्ग यांना खाजगी वाहनांने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे  आणि ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होत असुन त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. उरण ते नवघर सर्कल येथून एस. टी जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग नवघर गाव येथील तु. ह. वाजेकर कमानीपर्यंत करण्यात यावा.एस.टी बसची सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी हितेश रमेश भोईर माजी उपसरपंच नवघर  ग्रामपंचायत तथा संघटक शिवसेना अवजड वाहतुक सेना उरण,कुणाल अरुण पाटील उपाध्यक्ष शिवसेना अवजड वाहतुक सेना उरण, जगदीश लक्ष्मण ठाकुर शिवसेना अवजड वाहतुक सेना,महेंद्र पाटील शाखा प्रमुख पागोटे, रमेश पाटील शिवसेना सल्लागार पागोटे,चेतन मनोहर पाटील शिवसेना नवघर युवा सेना विभाग अध्यक्ष, शिवसैनिक जयेंद्र रमेश भोईर, कु. शुभम मनोहर पाटील, विनय हरेश्वर पाटील, प्रणय पाटील यांनी महामंडळच्या उरण आगारात वाहतूक निरीक्षक रोहन अरविंद खलीपे यांची भेट घेऊन सदर समस्या बाबत त्यांना निवेदन दिले.शिवसेना शाखा नवघर,शिवसेना शाखा पागोटे, अवजड वाहतुक सेना, उरणचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.
नवघर येथील तुकाराम हरी वाजेकर कमानी पर्यंत महामंडळची बससेवा सुरु झाल्यास त्याचा फायदा नवघर, कुंडेगाव, पागोटे या गावातील विद्यार्थी, ग्रामस्थांना होऊन यामुळे पैसे, वेळ व श्रमाची बचत देखील होणार आहे त्यामुळे नवघर येथील तु. ह. वाजेकर कमानी पर्यंत बससेवा सुरु करावी अशी मागणी जनतेतून सुद्धा होऊ लागली आहे.

जास्तीत जास्त प्रवाशी वर्गांना, नागरिकांना उत्तमोत्तम सेवा सुविधा देणे आमचे कर्तव्य आहे.सदर सुचविलेला मार्ग महत्वाचा असून नवघर येथील तु. ह. वाजेकर कमानी पर्यंत बससेवा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सदर निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवू. त्यांचे आदेश आल्यानंतर, प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर सदर मार्गावर बससेवा सुरु करण्यात येईल.

रोहन अरविंद खलीपे.वाहतूक निरीक्षकउरण बस आगार.

Leave A Reply

Your email address will not be published.