फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत २५ जुलैपासून प्रशिक्षण
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
रत्नागिरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 च्या मंजूर आराखड्यानुसार मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे ता. मावळ जि.पुणे या ठिकाणी विविध विषयावरील प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
25 ते 29 जुलै 2022 या कालावधीमधे हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स, ऑगस्ट महिन्यामध्ये 01 ते 05 ऑगस्ट 2022 या कालावधीत हरीतगृह/पॉलीग्रीन हाऊस व्यवस्थापन, 08 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत हॉटीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स व 22 ते 26 ऑगस्ट 2022 व 12 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत काढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला), 29 ते 21 सप्टेंबर 2022 या कालावधीत रोपवाटीका व्यवस्थापन (फळे व भाजीपाला) या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये पिकनिहाय लागवड व प्रक्रिया यामधे हळद व आले याबाबतचे प्रशिक्षण 05 ते
07 सप्टेंबर 2022 या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे तालुका
अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.तरी सर्व शेतकरी बंधुनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी यांनी आहे.