Ultimate magazine theme for WordPress.

भेंडखळ येथील श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ धावले जांभूळपाडा दुर्घटना मदतीला

0 23

दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला दिले एक महिन्याचे रेशन तसेच जीवनावश्यक वस्तू

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील जांभूळपाडा कातकरी वाडीतील राम कातकरी यांचा अतिवृष्टीमुळे अंगावर घर पडून मृत्यू झाला. तसेच घरातील इतर सदस्य जखमी झाले होते. राहते घर पडल्यामुळे सध्या स्थितीला कातकरी कुटुंबाची परिस्थिती खूपच वाईट आणि हलाखीची झालेली आहे. आपण या समाजाने काही देणं लागतो यावृत्तीमुळे भेंडखळ येथील श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळाने जांभूळपाडा कातकरी वाडी येथील दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला एक महिन्याचे रेशन तसेच जीवनावश्यक वस्तूं दिल्या आहेत.
तसेच श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळाने उरणवासियांना आवाहन सुद्धा केले आहे की, आपण या समाजाचे काही देणं लागतो. आपण माणुसकी म्हणून २००-३०० किलोमीटर दूर जाऊन कोल्हापूर, महाड येथे पूरग्रस्तांना भरभरून मदत केली व त्यांना आधार देऊन माणुसकीचे दर्शन दिले. पण आजची परिस्थिती बिकट आहे. प्रत्यक्षात आपल्या उरणमध्ये अशी दुर्दैवी घटना घडली. सदर दुर्घटनाग्रस्थांना सध्या अंगावर घालायला कपडे नाहीत, ना राशन, ना जेवण शिजवायला भांडी. जे होते नव्हते ते पडक्या घरात दबून गेले. सध्या ते अंदाजे 10’X14′ च्या गावातील पर्यायी खोलीत तात्पुरते राहत आहेत. म्हणून ज्याला जमेल त्यांनी जांभूळपाडा वाडीवर जाऊन सदर दुर्घटनाग्रस्तांची मदत करावी

Leave A Reply

Your email address will not be published.