राजापूर शहराला पुराचा वेढा
राजापूर : राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा घातला आहे.
गेले तीन चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जवाहर चौकामध्ये पाणी येण्याची यंदाची ही पहिली घटना आहे. पावसाची सध्याची स्थिती पाहून शहरातील व्यापारी सतर्क झाले असून त्यांनी आपल्या सामानाची सुरक्षित स्थळी वेळीच हलवाहलव केली आहे. तालुक्यातील पूर्व अर्जुना धरणाचा कालवा मुसळधार पावसामुळे फुटल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेथील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.