राजू मुंबईकर महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्काराने सन्मानित
उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे) मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने औरंगाबाद येथील मौलाना आझाद संशोधन केंद्र टि.व्ही सेंटर या सभा गृहात विविध क्षेत्रातील गुणवतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निसर्ग संरक्षण, वन्यजीव संरक्षण,आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, गरिब व गरजू व्यक्तींना मदत आदि या कार्याची दखल घेत उरणचे सुपुत्र रायगड भूषण राजू मुंबईकर यांना माजी खासदार भागवतजी कराड यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अंबादासजी दानवे( विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य), जेष्ठ समाज सेवक रमेश अण्णा मुळे,जेष्ठ साहित्यिक प्रा.ऋषिकेश कांबळे यांच्या सोबतच मानसी महिला बहूउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या अध्यक्षा डॉ.आशा पाटील,सुलक्षणा शिंदे पाटील( सचिव ) आणि समस्त मानसी सेवाभावी संस्था महाराष्ट्र या संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा अगदी मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाल
मानवतावादी व पर्यावरणवादी कार्यामुळे राजू मुंबईकर यांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरिय, राष्ट्रीय पुरस्कार मिळाली आहेत. मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र या नामांकित संस्थेतर्फे राजू मुंबईकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत असून विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.