Breaking | रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर दुचाकीस्वाराचा अपघात ; बेशुद्ध तरुणाला रुग्णालयात हलवले

 

रत्नागिरी : येथील रेल्वे स्थानकावर दुचाकीने येणाऱ्या एका तरुण स्वाराची गाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील बॅरिकेड्सवर धडकल्याने अपघात झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला.

रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर दुचाकीने येणाऱ्या एका तरुणाची गाडी स्थानकाच्याप्रवेशद्वारासमोरील बॅरिकेड्सवर धडकल्याने दुचाकीवरील तरुण घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत सुमारे वीस मिनिटे पडून होता. मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागली असता या गाडीने जाणाऱ्या प्रवाशांची फलाटावर जाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोरील मुख्य प्रवेशद्वारावर जिथे वाहने आत येऊ नयेत, यासाठी लोखंडी अडथळे लावण्यात आले आहेत, नेमक्या याच अडथळ्यांवर एका तरुणाची दुचाकी धडकली आणि त्यावरील तरुण कोसळला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटानंतर लोकांची गर्दी जमल्यावर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातामधील जखमी तरुणाला रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.
अपघातग्रस्त तरुणाची ओळख लगेच पटली नव्हती.
दरम्यान, हा अपघात दुचाकिस्वाराच्या गाडीचे ब्रेक न लागल्यामुळे झाला का अन्य कोणत्या कारणाने हे समजू शकलेले नाही.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE