आशियाई स्पर्धा गाजवलेली रत्नागिरीची खो -खोपटू अपेक्षा सुतारचा नीलेश राणे यांनी केला सत्कार!

 

रत्नागिरी : गुवाहाटी आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारताच्या खो खो च्या मुलगे आणि मुलींचे संघ अंतिम फेरीत विजयी झाले आणि त्यांनी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यातील मुलींच्या संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरीच्या खो खो पटू अपेक्षा सुतार हिचाही समावेश होता. स्पर्धेमध्ये अपेक्षाने उत्तम कामगिरी करत चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

खो खो च्या विजयी संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या रत्नागिरीची कन्यका अपेक्षा हिचा रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी सत्कार करून तिच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी स्वाभिमान क्रीडा संघाचे अध्यक्ष सतेज नलावडे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयी झालेल्या भारताच्या महिला संघात महाराष्ट्र आणि रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अपेक्षा सुतार हिचा सत्कार केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE