रत्नागिरी : मागील काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गे सुरू असलेली उधना ते मंगळूरु विशेष गाडीच्या फेऱ्याना ८ जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या सुरत जंक्शन जवळील उधना जंक्शन ते मंगरूरु अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडी सोडली रजातं आहे. (09057/09058) या क्रमांकाने ही गाडी चालवली जात आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उधना ते मंगळूरू दरम्यान या विशेष गाडीच्या फेऱ्यांना 7 जानेवारी तर मंगळूरू ते उधना दरम्यानच्या फेऱ्यांना 8 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- हे देखील वाचा : Konkan Railway | कोकण रेल्वेची २ कोटी ५ लाख ५२ हजारांची दंडवसुली!
- Konkan Railway | कोकणातून धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना माणगाव स्थानकावर प्रायोगिक थांबा
- जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा!
