महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला यश
उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे )उलवा नोड मधील सेक्टर १९ प्लॉट नंबर ९२,९३ मध्ये बांधलेल्या अनधिकृत शेड बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सिडकोला निवेदन देण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांनी सिडकोचे अभियंता (द्रोणागिरी /उलवे )एस एस गोसावी यांच्याकडे निवेदन दिले. त्या निवेदनात अनधिकृत शेड बाबतीत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, जिल्हासचिव केसरीनाथ पाटील, उरण तालुका सचिव अल्पेश कडू,पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष गोंधळी, उलवा शहराध्यक्ष राहुल पाटील, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, विभाग अध्यक्ष तुषार म्हात्रे, दत्तात्रय पाटील आणि महाराष्ट्र सैनिक हजर होते. मनसेच्या या निवेदनाची दखल घेत सिडको व्यवस्थापनने उलवे मधील अनधिकृत शेडवर कायदेशीर कारवाई करत सर्व बांधकाम जमिनोदस्त केले.
या संदर्भात मनसेकडून दि. 31 मार्चला निवेदन देण्यात आले या निवेदनाची दखल घेत प्रशासनातर्फे 9 मे 2023 रोजी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आली. मनसेने या गोष्टीचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली आहे. या कारवाई बाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले आहेत.


कारवाई केल्यानंतर
