पिकविमा योजनेत संगमेश्वर तालुका अग्रेसर

बापू शिंदेंचे प्रयत्न ; शेतकऱ्यांनी उतरवला ५ कोटींचा विमा

देवरूख (सुरेश सप्रे) : १ रू.यात पिक विमा योजनेत संगमेश्वर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे येथील भडकंबाचे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बापू शिंदे यांनी विशेष मेहनत घेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचत विमा उतरविणे भर दिला होता.

बापू शिंदे यांनी योजनेत ऑनलाईन नोंदणी करताना ४ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहचत सहभाग नोंदवत ५ कोटी २५ लाखांचा पिक विमा उतरविला. शेतकऱ्याच्या दारापर्यंत रथ उभारत या योजनेचे महत्त्व समजवून दिले.

त्यांनी १९०० हेक्टर जमिनीवर पिक घेतलेल्या ५२५ शेतकरी यांनी संरक्षण पिक विमा उतरवला साठी तालुका कृषी अधिकारी. कृषी सहाय्यक. अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी सहकार्य केले.

एक रुपयात भात कवच विमा योजना राबवण्यात आपल्याला एक रुपयाची संधी उपलब्ध झाली होती. ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणेसाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत शिंदेनी घरोघरी जाऊन शेतकरीवर्गाने लाभ घेण्याचे आवाहन केले.
प्रथमच हो योजना सुरू असल्याने अनेक संभ्रमात होते; परंतु या योजनेचे आवश्यक कागदपत्रे वेळीच समजावल्याने हजारो शेतकऱ्यांना वर्गाला या योजनेतून लाभ मिळवून दिला.

दोन वर्षांपूर्वी कापलेले भात वाहून गेले. यावेळी विमा उतरवलेल्या शेतकरी यांना भरपाई देण्यात आली. त्याचा फायदा मिळाला. कोकणातील शेती चांगली असल्यामुळे ते विमा उतरवत नाहित. त्यामुळे नुकसान झालेस त्यांना विमा भरपाई मिळतात नाही. पण ज्या शेतकरी वर्गाने विमा उतरवला त्यांना भरपाईची रक्कम मिळाली हे दाखवून दिले.व दुर्लक्ष न करता आर्थिक मदत दिली जाते. हीबाब शेतकऱ्याच्या लक्षात आणून दिली गेली, त्यामुळे यंदा चांगला प्रतिसाद लाभल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE