रत्नागिरी, दि.4 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार निवडणुकीची विविध कामे विषयवार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकूण 18 समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. समितीमधील समन्वय अधिकारी (Nodal Officer) व सहाय्यक यांची त्यांना नेमून दिलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आढावा घेतला.
या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणूकीचे कामकाज टप्पे निहाय पार पाडण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेची माहिती देण्यात आली.
कामकाज करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक विषय समितीने कोणकोणती कामे करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. भारत निवडणूक आयोगाने दिलेली प्रत्येक कामाच्या कालमर्यादेचे पालन व अचूकतेने करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सर्व समिती प्रमुखांना दिल्या.
