चिपळूण-पनवेल, पनवेल -रत्नागिरी प्रवासासाठी उद्या अनारक्षित मेमू लोकल

रत्नागिरी : कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने ०११५८ चिपळूण -पनवेल / ०११५७ पनवेल -रत्नागिरी अशी संपूर्ण अनारक्षित असणारी ८ डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन चालवली जात आहे. ही गाडी दि. ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली असून ती ३१ मार्च २०२४ पर्यंत फक्त रविवारी धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ०११५७ चिपळूण येथून दुपारी ३:२५ ला सुटून पनवेल येथे रात्री ८:१५ ला पोहोचेल आणि ०११५७ पनवेल येथून रात्री ८:२५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

०११५८ चिपळूण- पनवेल मेमूचे थांबे

अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे

०११५७ पनवेल-रत्नागिरी मेमूचे थांबे

सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE