कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एका एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवल्या!

  • होळी आटोपून परतीला लागलेल्या प्रवाशांना दिलासा

रत्नागिरी : कोकणातून होळी उत्सव आटोपून परतीला लागलेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळे उधना ते मंगळूरु या कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आले आहेत.

या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार उधना ते मंगळुरू या मार्गावर होळीसाठी जाहीर करण्यात आलेली विशेष गाडी (09057) आता दिनांक 31 मार्च व 3 एप्रिल 2024 रोजी देखील धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (09058) दिनांक १ आणि ४ एप्रिल २०२४ रोजी सुद्धा धावणार आहे.

या स्थानकांवर थांबणार!

ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE