कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्यांच्या आणखी ३२ फेऱ्या जाहीर!

  • १८ एप्रिल ते ९ जून या कालावधीत धावणार
  • दोन्ही विशेष गाड्यांच्या मिळून एकूण ३२ फेऱ्या होणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या उन्हाळी हंगाम 2024 साठी अतिरिक्त समर स्पेशल गाड्यांची घोषणा रेल्वे कडून करण्यात आली आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील थिवीदरम्यान दोन विशेष गाड्यांच्या एकूण 32 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार 01187 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 18 एप्रिल 2024 ते 6 जून 2024 या कालावधीत आठवड्यातून एकदा दर गुरुवारी धावणार आहे. ही विशेष गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी सुटून सकाळी ९ वाजून 50 मिनिटांनी ती थिवीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी (01188) ठेवी स्थानकावरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी सुटून शनिवारी ती पहाटे 3.45 वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी एकूण 22 डब्यांची एलएचबी श्रेणीतील गाडी असेल.

समर स्पेशल गाडीचे थांबे


ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, तसेच सावंतवाडी.

दुसरी विशेष गाडी (01129/01130) देखील लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठेवीदरम्यान धावणार आहे.
ही गाडी देखील आठवड्यातून एकदा धावणार आहे. 22 आयसीएफ डब्यांची ही गाडी असेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी दिनांक 20 एप्रिल ते आठ जून 2024 या कालावधीत शनिवारी धावेल.

ही गाडी(01129 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी थीवीला ती सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी (01130) दिनांक 21 एप्रिल ते नऊ जून 2024 या कालावधीत फक्त रविवारी धावेल. थीवी येथून ही गाडी सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून 45 मिनिटांनी ती लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.


दुसऱ्या समर स्पेशल गाडीचे थांबे


ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, तसेच सावंतवाडी.

या दोन्ही समर स्पेशल गाड्यांच्या मिळून एकूण 32 फेऱ्या 9 जून 2024 पर्यंत होणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE