लांजा : लांजा तालुक्यात २९ महिला समर्थपणे पोलीस पाटल म्हणून मानाचे पद घेऊन गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हानात्मक काम लीलया करत आहेत. या नारीशक्तीचे विशेष कौतुक होत आहे. तालुक्यात १२३ गावात पोलीस पाटलांची ९८ पदे भरण्यत आली असून २४ पदे रिक्त आहेत. नुकतीच पोलीस पाटील या पदासाठी भरती आरक्षण आणि लेखी परीक्षा,शैक्षणिक पात्रता मुलाखतीद्वारे करण्यात आली महिला आरक्षण असल्याने अनेक पदवीधर बारावी उच्चशिक्षित महिला उमेदवाराना गावाच्या कारभारात मानाचे पोलीस पाटील हे पद मिळाले आहे. या महिलांना गावाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
33 टक्के महिला आरक्षण या पोलीस पाटील पदासाठी आहे बॉम्बे सिव्हिल ऍक्ट 1857 नुसार पोलीस पाटील पद निर्मिती झाली महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 नुसार 1 जानेवारी 1962 वंशपरंपरागत मुलकी पोलीस पाटील की रद्द करण्यात आली. आता आरक्षण आणि शैक्षणिक पात्रता नुसार या मानाच्या पदाला महत्व प्राप्त झाले आहे लांजा तालुक्यातील 29 महिला आज अतिशय समर्थ पणे हे पोलीस पाटील पद संभाळत आहेत

शिरबिवली या छोट्याशा गावातील सौ दर्शना दिगंबर सावंत या गेली आठ वर्षे पोलीस पाटील पद यशस्वी पणे संभाळत आहेत यांच्या कधी ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की त्या कधी पोलीस पाटील बनतील. पण पोलीस पाटील पदावर नियुक्ती झाली आणि त्याचं आयुष्य बदलूनच गेले गावाच्या निर्णय प्रक्रियेत अचानक महत्त्व प्राप्त झालं.यांच्या कामाविषयी त्या पुढे सांगत माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या महिलेला आपल्या गावच्या पोलीस पाटील होण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
“या पदामुळे ग्रामपंचायत आणि गावात मला सन्मानानं बघितलं जातं. लोक आदरानं बोलतात. भांडण तंटा सोडवताना आपण दिलेला निर्णय मान्य केला जातो, याचं अप्रुप वाटतं. मी घरातल्याच काय गावगाड्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभाग घेत आहे.
पोलीस पाटील पदं महिलांसाठी 33 टक्के राखीव केल्यामुळे आज अनेक महिलांना या पदावर काम करता येत आहे. लांजा तालुक्यात शिरंबवली सौ दर्शना सावंत,शिपोशी तेजस्विनी धावडे,,कुवे शैलजा गुरव,वाघांणगाव आश्विनी माईल,खानवळी स्नेहा शिंदे, आंजणारी सौ श्रद्धा सरपोतदार ,पुनस वैदेही यादव, आसगे स्वरूप दाभोलकर, जावडे श्वेता बेर्डे, विलवडे सौ दीपाली खामकर,बोरिवले जानवी कालकर गोविल वैदेही गुरव ,कोंडगे खोरगाव वनिता सावंत,उपळे विरगाव विधी वीर,वेरवली साक्षी जाधव, कोंडये रांबडेगाव सौ श्वेता पन्हाळकर,निओशी वैदेही गुरव, बनखोर सौ मयुरी ब्रीद,कुरणे सुप्रिया घडशी,शिपोशी बाईग गाव अवनी बाने, पुनस रुंजी कांबळे, वेरळ सना मुल्ला,खेरवसे रुपाली कांबळे, लांजा गोंडेसखल साक्षी गुरव, वेहळ स्पृहा जाधव,मठ कडूगाव सुप्रिया सुर्वे,आडवली रोशनी आगरे या 29 महिला नारी शक्ती आजच्या घडीला गावाचा कारभार धाडस आणि समर्थ संभाळत आहेत या सर्व जणींचे कौतुक आहे काहींची नुकतीच नियुक्ती झाली आहे दोन महिन्यांपूर्वीच पोलीस पाटील पदावर नियुक्ती झाली.
“आम्ही आनंदी आहोत पहिल्यांदाच पोलीस पाटील या सरकारी पदावर नियुक्ती झाली आहे.” महिलांना एक नवी संधी पोलीस पाटील पदाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच या पदासाठी महिलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलं. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या महिलांना प्राधान्य मिळालं. साधारण 25 ते 40 वर्षें वयोगटातल्या महिलांचा त्यात समावेश आहे. ग्रामीण भागात महिलांवर होणारे अत्याचार जे बरेचदा उघडकीस येत नव्हते त्यांना आता त्यांना आळा बसण्यास निश्चित मदत होणार आहे बॉम्बे सिव्हिल अॅक्ट’ 1857 नुसार या पदाची निर्मिती करण्यात आली.
महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 अन्वये 1 जानेवारी 1962 पासून राज्यातलं वंशपरंपरागत मुलकी पाटलाचं पद रद्द झालं. आता महाराष्ट्र ग्राम अधिनियम 1967 नुसार लांजा तालुक्यातील महिला पोलीस पाटील यांचे पोलीस पाटील संघटना सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कोटकर यांनी अभिनंदन केले आहे
