राजापूर : राजापूर तालुक्यातील धामणपे बौद्धवाडीच्या रस्त्याला कवी, गायक, पत्रकार दि. महादेव बाळू जाधव यांचे नाव देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर – लांजा मतदार संघाचे आमदार डॉ. राजन साळवी उपस्थित होते. धामणपे बौद्धजन प्रगती मंडळाच्या वतीने महापुरुषांचा जयंती महोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, कवी, गायक दि. महादेव बाळू जाधव यांचे रस्त्याला नाव देण्याचा देखील।संपन्न झाला.
या प्रसंगी आमदार डॉ. राजन साळवी यांनी महादेव जाधव यांच्या कार्याचा उजाळा आपल्या मार्गदर्शनस्पर भाषणातून दिला.
या प्रसंगी दि. महादेव जाधव यांच्या पत्नी मानिनी जाधव, मंगेश जाधव, अमोल जाधव, पत्रकार प्रसाद जाधव, धामणपे बौद्धजन प्रगती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, शांताराम जाधव, सचिव राजेंद्र जाधव, विनोद जाधव, संजय जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नपाल जाधव यांनी केले होते.
