- गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकीचा कार्यानुभव अंतर्गत उपक्रम
माखजन : डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवन याच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी “बळीराजा संघ” माखजन येथे दाखल झाला आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी कायमस्वरूपी शेतकऱ्यांसोबत राहून कृषी विभागात सहकार्य करत आहेत. तसेच युवकांना व शेतकऱ्यांना शेतीचे व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.

यावेळी माखजन येथील शेतकरी उपस्थित होते. बळीराजा संघाचे विद्यार्थी ओमकार सत्रे, हर्षद कांजर, अभय जाधव, साहिल कुंभार, यश पांचाळ, प्रथमेश खिलारे, रोहन गावडे, अथर्व कदम, ओमकार राणे, विनय बैरी, यश गांगोडे आणि आर्य राणे.
