रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कोकण रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अनेकांनी कोकण रेल्वेसाठी प्राण गमावलेल्या कामगार तसेच अभियंत्यांना आदरांजली वाहिली.

दरवर्षी आजच्या दिवशी रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या ‘श्रमशक्ती स्मारक’ येथे कोकण रेल्वेच्या बांधकामादरम्यान आपले प्राणांचे बलिदान देणाऱ्या कामगार, अभियंते तसेच अधिकारी यांना आदरांजली वाहिली जाते. सोमवारी सकाळी हा आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

