महायुती सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार येत्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ तारखेला आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या शवथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात २८८ पैकी महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर बाजी मारली होती.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE