‘तिरंगा चषक’ क्रिकेट स्पर्धेचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन

उरण दि १६(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चिरनेर येथे सलग दहा वर्षे सुरू असलेल्या तिरंगा चषकाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी रात्री प्रकाशझोतात करण्यात आले. यावेळी त्यांनी एक लाख रुपयांची देणगी ‘तिरंगा चषक’साठी जाहीर केली. यावेळी आयोजकांच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उरण तालुक्यात मानाची समजली जाणारी प्रकाश झोतातील टेनिस क्रिकेट स्पर्धा चिरनेरमध्ये सलग दहा वर्षे सुरू आहे. यंदा दिवंगत बाजीराव परदेशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा चिरनेर-भोम कॉग्रेस आय व युवक काँग्रेस कमिटीने आयोजित केली आहे.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, चिरनेर ही हुतात्म्यांची नगरी आहे, १९३० मध्ये झालेला ब्रिटिशांविरुद्धचा जंगल सत्याग्रह हा ऐतिहासिक लढा आहे. गुरचरण जमिनी आपल्याच आहेत, त्यावर येत्या काळात सिडको वा एमएमआरडीएची वक्रदृष्टी पडू शकेल, त्याआधीच चिरनेरला भव्य मैदान मिळालेच पाहिजे, त्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करायला मी तयार आहे. येणाऱ्या पिढीसाठी मैदान ही काळाची गरज आहे.
चिरनेर परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या जागांवर वेळीच घरे बांधा, विकासाच्या नावावर सरकार जमिनी घेण्यापूर्वी ती घरे कायम करता येतील. नाही तर पुढे आपण फूटभर जागासुद्धा विकत घेऊ शकणार नाही, येणाऱ्या काळात जमिनींच्या किमती गगनाला भिडतील. त्यामुळे ग्रामस्थांनो, वेळीच जागे व्हा आणि राहण्यासाठी पहिल्यांदा घरे बांधा, असेही आवाहन महेंद्रशेठ घरत यांनी ग्रामस्थांना केले.
यावेळी उद्योजक राजाशेठ खारपाटील, डाॅ. मनीष पाटील, चिरनेरचे उपसरपंच सचिन घबाडी, तसेच ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते.
मिलिंद पाडगावकर, अखलाक शिलोत्री,उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, अलंकार परदेशीं, किरीट पाटील, वैभव पाटील, उमेश ठाकूर, राजेंद्र भगत, किरण कुंभार, विवेक म्हात्रे तसेच असंख्य काग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE