कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे नेमके गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले

कोकण रेल्वे मार्ग विद्युतीकरण लोकार्पण केल्याबद्दल निलेश राणे यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण व्हावे हि कोकणवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी मी सुद्धा पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र त्यावेळी धूळखात पडलेल्या या मागणीचे गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले आणि त्यांच्याच हस्ते शुभारंभ झाला, ही नियतीचीच इच्छा होती, असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू येथून झाले. तर रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावरून विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गावरून पहिली ट्रेन धावली. याचे कोकणवासीयांची जल्लोषात स्वागत केले. यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची आमची अनेक वर्षांची मागणी होती. यासाठी मी सुद्धा खासदारकीच्या पाच वर्षांच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र त्यावेळी आमची मागणी धूळखात पडली होती. परंतु या विद्युतीकरणाचे महत्त्व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणले आणि त्यांच्या कार्यकाळात रेकॉर्ड टाइममध्ये पूर्ण सुद्धा केले. याबद्दल पंतप्रधानांचे आम्ही कोकणवासीय आभारी आहोत .

या विद्युतीकरणाचा नेमका फायदा येत्या काळात समजणार आहे. या एका ऐतिहासिक बदलामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे, निसर्गरम्य कोकणातील प्रदूषण कमी होणार असून इंधन खर्चावर मोठी बचत होणार आहे. या सगळ्या बदलामुळे कोकण रेल्वेमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होणार आहे.

असे हे ऐतिहासिक काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच व्हावे हीच कदाचित नियतीची इच्छा होती. म्हणूनच इतक्या वर्षानंतर हे महत्त्वाचे काम पूर्णत्वाला गेले आहे असे निलेश राणे म्हणाले.

Twitter : (5) Nilesh N Rane (@meNeeleshNRane) / Twitter

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE