रत्नागिरी : तालुकास्तरावरील अधिकाऱ्याकडून ११ हजार रुपयांची लाच घेताना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी लोकसेवक प्रदीप प्रीतम केदार (५०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील क्लास वन ऑफिसरने तालुकास्तरावरील आपल्याच विभागातील पुरवठा निरीक्षकाकडून धान्य तफावतीबाबत वरिष्ठ कार्यालयाला नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी या प्रकरणात एकूण पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती.
सविस्तर वृत्त याप्रमाणे ⬇️⬇️
- यशस्वी सापळा कारवाई बाबत
- युनिट – रत्नागिरी
- तक्रारदार-
- पुरुष वय ५० वर्ष
- आरोपी लोकसेवक
- प्रदीप प्रीतम केदार ५० वर्ष, जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग १) जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी
- तक्रार प्राप्त दिनांक – 28/03/2025
- लाचेची मागणी पडताळणी व सापळा दिनांक
- 28 मार्च /2025
- लाचेची मागणी रक्कम तक्रारीनुसार
- 15,000/- रुपये तडजोडीअंती 11,000/- रुपये
- लाच स्वीकृती व हस्तगत रक्कम तडजोडीअंती 11,000/- रुपये स्वीकारले
- लाचेचे कारण
- यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदाम यास माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी, तहसीलदार संगमेश्वर यांनी दिनांक 22/03/2025 रोजी भेट दिली होती त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते तसेच त्यानंतर लोकसेवक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री केदार यांनी तक्रारदार यांचे अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगून तसेच गैरहजर असल्याचे सांगून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांचे लाचेची मागणी केली त्यानुसार लोकसेवक केदार यांनी दिनांक 28/03/2025 रोजी तडजोडीअंती 11,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले व लाच रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले, लोकसेवक यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही ला . प्र वि. कार्यालय रत्नागिरी येथे सुरू आहे
सापळा अधिकारी
पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, ला.प्र. वि रत्नागिरी
सापळा पथक
पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव
सहाय्यक फौजदार चांदणे
पोहवा/ दीपक आंबेकर
पोहवा / संजय वाघाटे
पोह/ विशाल नलावडे
पोअं/ राजेश गावकर
मार्गदर्शन अधिकारी
मा.श्री. शिवराज पाटील सो ,
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र
मा.सुहास शिंदे सो,
अप्पर पोलीस अधीक्षक
एसीबी ठाणे परिक्षेत्र*
मा.श्री.संजय गोविलकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र.
मा. श्री अविनाश पाटील, पोलीस उपअधीक्षक, एसीबी, रत्नागिरी
महाराष्ट्रातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी
*दुरध्वनी क्रमांक 02352/222893,
7588941247टोल फ्रि क्रं. १०६४
