- गुरे धुण्यासाठी गेला असता घडली घटना
चिपळूण : रामपूर-तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिक अजय लटके (३०, भालघर) असे त्याचे नाव आहे. गुढीपाडव्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक हा रविवारी तांबी धरणात नेहमीप्रमाणे गुरे धुण्यासाठी गेला होता. यावेळी बैलाला बांधलेली दोरी सुटल्याने त्याचा तोल गेला व तो पाण्यात बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी येथे धाव घेतली. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्याचा धरणात शोध घेण्यासाठी नगर परिषदेकडे बोट मागण्यात आली. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी बोट चालक शौकत गोलंदाज, नगर परिषदेचे कर्मचारी जयंत कासार आदींना यंत्रणा घेऊन पाठवले. त्यानुसार शोध घेण्यात आला असता सायंकाळी प्रतिक याचा मृतदेह सापडला. याची पोलीस ठाणेत नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
हे देखील वाचा : Konkan Railway | रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा
