Ultimate magazine theme for WordPress.

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून लांजा एसटी बसस्थानकाचे रुपडे पालटणार!

0 238

लांजा : काही वर्षे रखडलेल्या,दुर्लक्षित लांजा एसटी बस स्थानकाचा कायापालट होत असून एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काँक्रिटीकरण आणि सुसज्जा इमारत याचे काम वेगाने सुरू झाले आहे. काँक्रिटीकरण एक कोटी आठ लाख आणि इमारत सुमारे दीड कोटी रुपये खर्च लांजा एसटी बस स्थानकाच्या सुसज्जतेवर होणार आहे.

दरम्यान, एसटी बस स्थानकाच्या नूतनांनी कारणामुळे करणामुळे एसटी फेऱ्या आज 18 मे पासून लांजा हायस्कूल येथील पटंगणातून सुटणार आहेत मात्र हायटेक लांजा बस स्थानकाचे नियोजित आराखडा बारगळला असून केवळ दीड कोटी रुपयांचे नवीन इमारत होत आहे.


एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात ६०० कोटींचा सामंजस्य करार झाला आहे राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील या १९३ बस स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरण होत आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यभरात एसटीची ६०९ बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या ५६३ बसस्थानके कार्यरत बस स्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटीच्या अमृतमहोत्सवी समारंभात केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात MIDC १९३ एसटी बसस्थानकासाठी कॉक्रिटीकरण करण्यासाठी ५०० कोटी रुपये आणि रंगरंगोटी ,किरकोळ दुरुस्ती करण्याची १०० कोटी रुपये खर्चाची निविदा आहे.

लांजा बस स्थानकासाठी हायटेक आराखडा तयार करण्यात आला होता. काही वर्षा पूर्वी फौंडेशन कामाला सुरुवात झाली होती  मात्र अपुऱ्या निधी मुळे हायटेक बस स्थानक काम थांबले होते. आता जुनी इमारत ,जुने कॅन्टीन हा भाग मोडीत काढून नवीन इमारत दीड कोटींची आहे यात व्यापारी गाळे आहेत उपहारगृह, आरक्षण खिडकी बस स्थानक प्रमुख कार्यलय आदी सुविधा आहेत प्रवासी स्वछता गृह आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.