रत्नागिरी, दि. ३० (जिमाका) : जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शेतकऱ्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, आत्माच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. पांगरे, नाबार्डचे मंगेश कुलकर्णी आदीसह शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभाग, नाबार्ड आणि आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. कृषी पायाभूत सुविधा निधी योजना या योजनेबाबत क्लिपच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागांच्या कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.