Ultimate magazine theme for WordPress.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या… कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून ६ दिवसांचा ‘मेगाब्लॉक’!

0 8,749

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकमध्ये नंदिकुर रेल्वे स्टेशन येथे मार्गावरील पॉईंट बदलण्याच्या कामासाठी दि. 24 ते 29 फेब्रुवारी 2024 असा तब्बल सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील या मेगाब्लॉकमुळे
१) गाडी क्रमांक 12978 ही अजमेर ते एर्नाकुलम दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी उडुपी स्थानकावर वीस मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

२) ओखा ते एर्नाकुलम दरम्यान धावणारी गाडी क्रमांक 16337 जिचा प्रवास 24 फेब्रुवारीला सुरू होतो ती मडगाव ते उडपी दरम्यान 45 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

३) ट्रेन नंबर 22114 ही कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी सुटणारी गाडी 100 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून

Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या

याचबरोबर मडगावच्या पुढे धावणाऱ्या इतर तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.