https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरून शेकडो मैलांचा पल्ला गाठत कासव पोचले श्रीलंकेच्या सागरी हद्दीत!

0 141

रत्नागिरी : गुहागर किनार्‍यावरून निघालेले ऑलिव्ह रिडले कासवाने आतापर्यंत श्रीलंकेपर्यंतचा पल्ला गाठला आहे शेकडो मैलांचा हा प्रवास बागेश्री नावाच्या कासवाने अवघ्या साडेचार महिन्यात पार केला आहे. सध्या श्रीलंकेच्या समुद्री हद्दीत असलेली बागेश्री गॅले या शहराकडे वळत आहे.

वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाने फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रा किनाऱ्यावर आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना बागेश्री व गुहा अशी नावे दिली होती. या दोन्ही कासवांना 21 फेब्रुवारी रोजी रेडीओ टॅग करून सॅटेलाईट ट्रान्समीटरशी जोडण्यात आले होते. त्यानंतर 23 फ्रेबुवारी रोजी या कासवांना समुद्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही कासवांचे लोकेशन वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाला सतत मिळत असते. 18 जून रोजी बागेश्री हे कासव कन्याकुमारी येथे दिसले होते. त्यानंतर या कासवाने श्रीलंकेकडे प्रवास सुरू केला.

दरम्यान, 3 जुलै रोजी या कासवाने श्रीलंकेची सागरी हद्द पार केली आहे. तिथून ते गॅले या शहराच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ४२ ॲम्बुलन्स रुग्णांच्या सेवेत!

Leave A Reply

Your email address will not be published.