माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुवारबाव येथे क्रीडा महोत्सव

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब तसेच भाजपा कुवारबाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीड़ा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या क्रीडा महोत्सवा अंतर्गत स्पर्धा दि. २० ते २६ मार्च या कालावधित होत असून यामधे क्रिकेट, महिला व पुरुष कबड्डी सामने अंतर्भूत आहेत. क्रीड़ा महोत्सवाचे उदघाटन भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लिलाधार भड़कमकर, तालुक़ा अध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुक़ा सरचिटणीस उमेश कुलकर्णी, तालुक़ा उपाध्यक्ष संकेत कदम, प्रभाकर खानविलकर, पिंट्या निवळकर, चंद्रकांत गराटे, लखन पावसकर, दीपक आपटे, अभि पाडळकर, नितीश आपकरे, रसिक कदम, संकेत शिंदे, प्रशांत पाटिल,विशाल भाट्ये, रतन माने, संतोष चव्हाण, सोहम खानविलकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष सतेज नलावडे यानी उपस्थितांचे आभार मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE