काँग्रेसचे नागपूरमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय नवसंकल्प सोशल मीडिया शिबीर
दि. 28 व 29 मे रोजी दोन दिवसीय आयोजन
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागातर्फे नागपूर येथे 28 व 29 मे रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय “नवसंकल्प सोशल मीडिया शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.
शनिवारी 28 मे रोजी आयोजित राज्यस्तरीय शिबिरात काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी सहभागी होतील. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोकराव चव्हाण व राज्यातील सन्माननीय मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहतील.
रविवारी, 29 मे रोजी घेण्यात येणा-या राष्ट्रीय शिबिरात देशभरातील विविध राज्यांतील काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया विभागाचे समन्वयक व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव श्री. के. सी. वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे प्रमुख श्री. रोहण गुप्ता, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व इतर सन्माननीय नेते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.