रत्नागिरी : संस्थान श्री देव गणपतीपुळे येथे प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपदी गणेशोत्सवाचे आयोजन दि. 28 ऑगस्ट ते दि. 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त गणपपुळे येथील श्रींच्या मंदिरात उत्सव कालावधीत श्रींची पूजा व प्रसाद, सहस्र मोदक समर्पण, सुश्राव्य कीर्तन, सामूदायिक आरती व मंत्रपुष्प, महाप्रसाद तसेच श्रींची पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त मंदिरात कुरोली जिल्हा सातारा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. विलास गरवारे यांचे कीर्तन होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे मुख्य पूजारी अभिजीत घनवटकर यांनी दिली.
उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंच कमिटीतील सरपंच डॉ. विवेक भिडे, अमित मेहेंदळे, प्रा. विनायक राऊत, डॉ. श्रीराम केळकर, वेदमूर्ती श्रीहरी रानडे, विद्याधर शेंड्ये, नीलेश कोल्हटकर प्रयत्न करीत आहेत.
गणपतीपुळे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव सुरु
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |