Ultimate magazine theme for WordPress.

जागर वारसा संवर्धनाचा !

0 51

राजपुरातील देवाचे गोठणे युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीत समाविष्ट

पर्यटन व रोजगार संधीच्या जागृतीसाठी शनिवारी कार्यक्रम

वारसा संवर्धनाच्या माध्यमातून परिसराचा पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन विकास : रोजगाराच्या संधी

रत्नागिरी : निसर्गयात्री संस्था सदस्यांच्या  व संचालक डॉ. तेजस गर्गे,  पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या प्रयत्नातून राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे गावच्या हद्दीतील तसेच पंचक्रोशीतील बारसु येथील अश्मयुगीन कातळशिल्प ठिकाणे  युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीत समाविष्ट झाले आहे.  तसेच देवाचे गोठणे येथील ‘ सडा ‘ जैवविविधता वारसा स्थळ म्हणून प्रस्तावीत आहे. यानिमित्ताने देवाचे गोठणे हे गाव आणि पंचक्रोशी  आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.
यातून या परिसरातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला येणाऱ्या कालखंडात मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
कातळशिल्प रचनांसोबत देवाचे गोठणे गावाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा  लाभला आहे.
या सर्व गोष्टींचे महत्त्व त्या अनुषंगाने पंचक्रोशी, तालुका, जिल्हा पातळीवर निर्माण होणाऱ्या पर्यटनाच्या आणि रोजगाराच्या संधी याविषयी माहिती व्हावी यासाठी “जागर वारसा संवर्धनाचा” उपक्रमाअंतर्गत शनिवार दि. 21 मे  2022 रोजी भार्गवराम मंदिर, देवाचे गोठणे येथे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

दि. 21 मे 2022 रोजी (दुपारी 3 ते संध्याकाळी 6 )
स्थळ – भार्गवराम मंदिर, देवाचे गोठणे आयोजक ग्रामपंचायत देवाचे गोठणे, भार्गवराम मंदिर व्यवस्थापन आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा प्रशासन तसेच पुरातत्व आणि वस्तु संग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने “जागर वारसा संवर्धनाचा “

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन
प्रशासक, ग्रामपंचायत देवाचे गोठणे, प्रांताधिकारी, राजापूर तसेच तहसीलदार, राजापूर भार्गवराम मंदिर, व्यवस्थापन आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.