https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

थकबाकीदार ग्राहकांची वीज कापणार

0 74

सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

सिंधुदुर्गात आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग :- ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वीज बिलांच्या वसुलीसाठीही कसरत करावी लागते, ही बाब चिंतनीय आहे. महावितरणला ग्राहकांना सेवा देण्यासाठी वीज खरेदी करावी लागते. दैनंदिन कार्यचक्र व वीज खरेदीच्या खर्च भागविण्यासाठी पैसा लागतो. वीज सेवा वापरणे मात्र त्याचे मोल वेळेत अदा करण्यास टाळाटाळ करणे ही प्रवृत्ती बळावते आहे. त्यात महावितरणची आर्थिक कोंडी होते. तेव्हा ग्राहकांनी वीज बिल थकविल्यास विजपुरवठा खंडित करा, असे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

आज दि. २२ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० ते १ या वेळेत मा. श्री. चंद्रकांत डांगे यांनी सिंधुदुर्ग येथे महावितरणच्या उपविभागस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस मुख्य अभियंता मा.श्री. विजय भटकर, अधीक्षक अभियंता श्री. विनोद पाटील, कार्यकारी अभियंता श्री.विनोद विपर, श्री. बाळासाहेब मोहिते यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंता उपस्थित होते. यावेळी मा.श्री. डांगे यांनी आपत्तीप्रसंगी सज्ज राहणेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज मीटर रीडिंग एजन्सीचा आढावा घेतला. मीटर रीडिंग फोटो व्यवस्थित घेऊन अचूक मीटर रीडींग घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. 

मा.श्री.डांगे यांनी कणकवली विभागातील आचरा, देवगड, कणकवली, मालवण, वैभववाडी, कुडाळ विभागातील कुडाळ १ व २, सावंतवाडी ग्रामीण व शहर, वेंगुर्ले या सर्व उपविभागाचा आढावा घेतला. सध्या कणकवली विभागात ८८३४ (थकबाकी ३ कोटी १९ लक्ष) तर कुडाळ विभागात १२ हजार ४०२ ग्राहक (थकबाकी ३ कोटी ३१ लक्ष) विजपुरवठा खंडितसाठी पात्र आहेत. तरी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी वीज बिल थकलेल्या सर्व ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करा,असे त्यांनी आदेश दिले. ग्रामपंचायत पाणीपुरवठा व पथदिवे ग्राहकांचा विजपुरवठा एप्रिल २०२१ नंतरच्या थकीत व चालू वीजबिल वसुलीसाठी खंडित करा, असेही श्री. डांगे यांनी निर्देशित केले आहे.

सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६५ हजार ५९४ ग्राहकांकडे २७ कोटी ९ लक्ष रुपये वीज बिल थकबाकी आहे. त्यात घरगुती ५४ हजार ६१९ — ५ कोटी ३५ लक्ष, वाणिज्यिक ४७९५— १ कोटी ५२ लक्ष, औद्योगिक ७०७ — ८७ लक्ष, पथदिवे २३७५ — १६ कोटी ६५ लक्ष, सार्वजनिक पाणीपुरवठा ९७१ — २ कोटी १४ लक्ष वीज बिल थकबाकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.