सावर्डे : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण मध्ये दि. ०१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र कृषि दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी राज्यातील कृषिक्रांतीचे जनक,माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तृतीय वर्षातील कु.प्रज्ञा गोठणकर व द्वितीय वर्षातील कु.शितल डोहाळे या विद्यार्थ्यांनीनी कृषिदिनाविषयी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक मोहिरे यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिन का साजरा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.शमिका चोरगे यांनी कृषिदिन साजरा करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संकेत कदम यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम,प्राचार्या डॉ. शमिका चोरगे,सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
